Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

शहरातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०ज ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे या ठिकाणी रोखठोक मावळचे संपादक प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत आहे. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच होणारा पाणीपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत आहे. समस्त तळेगावकरांचा पाणी प्रश्न मार्गे लागावा याकरता प्रा नितीन फाकटकर हे लाक्षणिक उपोषण करणार आहे. पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी फाकटकर त्यांच्या उपोषणाला अनेक नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *