Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत महावितरण आणि सहकार विभाग, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी गृहरचना संस्थांना द्यावयाच्या अनुदान सबसिडी बाबत चर्चासत्र कार्यक्रम रविवार (दि. १०) ऑगस्ट २०२५ रोजी यशोधाम हॉल, यशवंतनगर हाऊस मॅनेजमेंट,सहकारी संस्था, तपोधाम कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास तळेगावातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी समक्ष उपस्थित राहून, सदर योजनेचा फायदा आपल्या सहकारी गृहरचना संस्थेस करून घ्यावा, असे आवाहन राज्य विद्युत मंडल यांच्याकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून युवराज जराग (अधिक्षक अभियंता, पुणे ग्रामीण मंडळ महावितरण), प्रकाश जगताप (जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण), डॉ. राजेंद्र येडके (कार्यकारी अभियंता, राजगुरूनगर महावितरण), डॉ.निलेश रोहनकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, रस्तापेठ विभाग,महावितरण), सर्जेराव कांदळकर (सहाय्ाक निबंधक, वडगाव मावळ) आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *