
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. रामदासजी काकडे व कार्यवाह मा.चंद्रकांतजी शेटे यांच्या मार्गदर्शनाने संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान,वाणिज्य, कला व तंत्रशिक्षण या विभागातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान व
देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने क्रांती दिनाच्या निमित्ताने व 15 ऑगस्ट चे औचित्य साधून देशभक्तीपर गीते वैयक्तिक व समूहगान स्पर्धा आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी यशोदा महादेव काकडे ऑफ इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये उत्साहाने पार पडली.
या स्पर्धेमध्ये सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला विभागाचे प्रा. डोके सर, विज्ञान विभागाच्या प्रा. संध्या केदारी यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले सर यांनी प्रास्ताविक पर केलेल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असल्याची व न घाबरता स्पर्धेला सामोरे जाण्याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा. गोरख काकडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .हर्षदा पाटील , प्रा. उषा भोसले व परीक्षक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांस्कृतिक विभागातील इतर सर्व सदस्य , प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व समूहगान खूप सुंदर पद्धतीने सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभागातील सदस्य प्रा दीप्ती कन्हेरीकर , प्रा .प्राची भेगडे ,प्रा. वृषाली खेंगले यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .वृषाली खेंगले यांनी केले. प्रा.शैलजा मतकर यांनी आभार मानले.
About The Author
