Spread the love

महान समाजसुधारकाला अभिवादन; अधिकारी–कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

राष्ट्रपिता आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी, विद्यमान नगरसेविका आशा अशोक भेगडे तसेच मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

कार्यक्रमाला नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक संदीप सोनवणे, जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रसाद गुरव, आरोग्य निरीक्षक सुनील काळकुटे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दत्तात्रय ढवळे, अनिल इंगळे, संतोष दाभाडे, रुपेश देशमुख, स्वप्निल आढागळे, श्याम गरुड आणि चंद्रशेखर खंते यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि स्त्री शिक्षण, शेतकरी व वंचित घटकांसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रम साधेपणाने पण अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण करून देत हा दिवस समाजजागृतीचा संदेश देणारा ठरला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *