
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा १० वा पदग्रहण समारंभ तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयाच्या दालनात रो.नितीन ढमाले (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २६-२७) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
पवन मावळातील पवना धरण परिसरातील दुर्गम भागात रोटरी सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शाळा उभारून शिक्षण क्षेत्रातील मॉडेल स्कूल उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्याचा मनोदय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी करताना रोटरी सिटीच्या माध्यमातून भंडारा डोंगर, सोमाटणे डोंगर,व गहुंजे या ठिकाणी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला .
सन २०२५-२६ करीता रो. भगवान शिंदे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तर रो. सुरेश दाभाडे यांनी उपाध्यक्ष पदाचा व रो. संजय मेहता यांनी सेक्रेटरी पदाचा पदभार स्वीकारला. या समारंभा दरम्यान रोटरीचा अत्यंत मानाचा रोटरी व्होकेशनल अवॉर्ड संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.शंकर महाराज मराठे यांना सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, नितीन ढमाले, भालचंद्र लेले,विवेक दिक्षित,सभापती शांताराम कदम, ह.भ.प.नंदकुमार भसे महाराज, साखर कारखाना संचालक सुभाष राक्षे,नरेंद्र ठाकर, विविध गावचे सरपंच, नगरसेवक, नागरीक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष भगवान शिंदे म्हणाले की, सर्व सभासदांच्या सहकार्याने क्लबच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवितांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीवर भरीव काम करण्याचा मानस व्यक्त केला. नवीन मेंबर्स यादी वाचन मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा यांनी केले. बुलेटीन चेअरमन डॉक्टर मिलिंद निकम संपादित सिटी फिनिक्स बुलेटीन व रोस्टर चेअरमन दशरथ ढमढेरे संपादित रोस्टरचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.रो. गणपत जाधव, संग्राम जगताप, मनोज नायडू, रघुनाथ कश्यप, राजू कडलक, संतोष मोईकर,तानाजी मराठे, सूर्यकांत म्हाळसकर, विश्वास कदम,वर्षा खारगे, संजय चव्हाण, रामनाथ कलावडे, संजय वाघमारे, सुनंदा वाघमारे, कमल ढमढेरे, स्वाती मुठे, निलेश राक्षे, प्रसाद बानगुडे,आनंदराव रिकामे,दशरथ पुजारी, पुंडलिक देशमुख, मोहन खांबेटे,दिनेश निळकंठ, संतोष घोलप,मनीषा ननावरे,सोमनाथ गव्हाणे, दिपाली पाटील,देविदास मराठे, बळीराम मराठे, रामदास काजळे, लक्ष्मण घोजगे, राजेश बारणे, संपत शेटे,वैशाली लगाडे, मनीषा पारखे, संजय भागवत, अनिल नरवडे, नवनाथ पडवळ, मुकुंद तनपुरे,विलास वाघमारे, बाळासाहेब चव्हाण, नीलम रोहिटे,शरयू देवळे,अंताराम काकडे,गोपाळ नागरे, नरेंद्र ननावरे,अविनाश नागरे, दलवीर सिंग कोचर इ.सह क्लबच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन डॉ मिलिंद निकम व वैशाली कोयते यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी केले.
About The Author
